१. न्यायसहायक विज्ञान म्हणजे काय?
न्यायसहायक विज्ञानाची व्याख्या "न्यायासाठीचे विज्ञान" किंवा गुन्हे अन्वेषणात मदत करणारे विज्ञान अशी केली जाते.
२. न्यायसहायक विज्ञान हे विज्ञानातील इतर विषयांचे अनुप्रयोग आहे का?
होय, न्यायसहायक विज्ञानामध्ये भौतिक, रासायनिक, जैविक आणि संगणक विज्ञानाचा वापर होतो.
३. महाराष्ट्रात किती न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा उपलब्ध आहेत?
महाराष्ट्रात एकूण ८ न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा उपलब्ध आहेत, मुंबई येथील संचालनालय हे मुख्य कार्यालय आहे आणि इतर ७ प्रादेशिक प्रयोगशाळा नागपूर, पुणे, औरंगाबाद, नाशिक, अमरावती, नांदेड आणि कोल्हापूर येथे आहेत. याशिवाय ठाणे, रत्नागिरी, धुळे, चंद्रपूर आणि सोलापूर येथे ५ लघु न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा कार्यरत आहेत.
४. महाराष्ट्रात डीएनएची सुविधा उपलब्ध आहे का?
होय, मुंबई येथील संचालनालय तसेच नागपूर, पुणे, औरंगाबाद, नाशिक आणि अमरावती येथील प्रयोगशाळांमध्ये डीएनए सुविधा उपलब्ध आहे.
५. महाराष्ट्रात सायबर फॉरेन्सिकची सुविधा उपलब्ध आहे का?
होय, सायबर फॉरेन्सिकची सुविधा मुंबई येथील संचालनालय तसेच नागपूर आणि पुणे येथील प्रयोगशाळांमध्ये उपलब्ध आहे.