न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, महाराष्ट्र ही न्यायवैज्ञानिक क्षेत्रातील जागतिक दर्जाची तंत्रज्ञानिक संस्था आहे.
न्यायसहायक विज्ञान हे गुन्ह्राची जलदगतीने उकल करुन देणारे आणि न्यायदानासाठी सक्षम पुरावा उपलब्ध करुन देणारे एक सक्षम माध्यम बनवणे हे आमचे उद्दिष्ट/ध्येय आहे.
निरंतर प्रयत्न, सातत्यपूर्ण संशोधनात्मक कार्य आणि अत्याधुनिक शास्त्रीय उपकरणे व तंत्रज्ञानाचा वापर या बाबी मुळे ही संस्था देशातील एक अग्रगण्य संस्था बनली आहे.