Sorry, you need to enable JavaScript to visit this website.

महासंचालकांचे डेस्क

न्यायसहायक विज्ञानाने गुन्हा शोधून तपासण्यासाठी न्यायव्यवस्थेमधील वैश्विक विश्वासार्हता प्राप्त केली आहे. न्यायसहायक विज्ञानाने आगामी काळासाठी स्वत: ला एक अविभाज्य साधन म्हणून स्थापित केले आहे आणि गुन्हेगाराला पकडण्यासाठी त्याची सत्यापित केलेली उपयुक्तता निःसंशय सिद्ध केली आहे.

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, महाराष्ट्र राज्य हे मुंबईच्या सांताक्रूझ येथे स्थित मुख्यालय आहे, ही एक बहु-शाखीय संस्था आहे तसेच नागपूर, पुणे, औरंगाबाद, नाशिक, अमरावती, नांदेड आणि कोल्हापूर येथे सात प्रादेशिक प्रयोगशाळा आहेत. सर्व प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा आणि मुंबई येथील प्रयोगशाळांमध्ये नमुने तपासणी व विश्लेषणासाठी सर्व आवश्यक सुविधा आहेत.

राज्याचा भौगोलिक प्रसार आणि तपास यंत्रणांची गरज लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने चंद्रपूर, सोलापूर, रत्नागिरी, धुळे आणि ठाणे जिल्ह्यात जीवशास्त्र आणि विषशास्त्र विभागातील मर्यादित सुविधा असलेल्या पाच लघु न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा सुरू केल्या आहेत. या प्रयोगशाळांमध्ये लवकरच अन्य शाखा देखील सुरू केल्या जाऊ शकतील.

महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्हा पोलिस युनिटमध्ये ४५ अत्याधुनिक सोयींनी सुसज्ज मोबाईल फॉरेन्सिक सपोर्ट युनिटसुद्धा सुरू केले आहेत; जे गुन्हेगारीच्या ठिकाणाहून योग्य आणि विशिष्ट सुगावे / नमुने संग्रहित करणे, जतन करणे, पॅकिंग करणे आणि अग्रेषित करण्यासाठी तपासणी संस्थांची मोठी मदत होत असल्याचे सिद्ध होत आहे.

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यामध्ये महासंचालक (न्यायिक व तांत्रिक) म्हणून काम पाहणे हा एक सन्मान व विशेषाधिकार आहे. प्रगतीशील जगाशी अद्यायावत राहण्यासाठी आणि तंत्रज्ञानाशी ताळमेळ कायम ठेवण्यासाठी संचालनालयाचे अधिकारी व कर्मचारी यांनी नेहमीच अद्ययावत तंत्रज्ञान व मशीनींचा शोध घेतला आहे.