Home About Us Services
Contact Us Blogs

Photo Gallery

मा.मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या निर्देशानुसार गतिमान प्रशासनासाठी शासनाच्या सर्व विभागांची सेवा विषयक प्रगती सुनिश्चित करण्याकरीता प्रत्येक सचिव निहाय मंत्रालयीन विभागाचे गुणांकन करण्यासाठी सेवाकर्मी कार्यक्रम २ टप्प्यात राबविण्यात आलेला आहे. त्याअनुषंगाने महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात आलेल्या सेवाकर्मी कार्यक्रमामध्ये न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयास वर्गवारी “प्रशंसनीय” आणि टक्केवारी “69.33%” गुणांकन प्राप्त झालेले आहे. याकरीता डॉ.विजय ज ठाकरे संचालक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांना महाराष्ट्र शासनाकडून या प्रशासकीय कामातील सक्रीय सहभागाबद्दल दि.२८.०३.२०२६ रोजी प्रमाणपत्राव्दारे गौरविण्यात आले.